Monday, 27 September 2021 | Login
किंशासाचा राजा

किंशासाचा राजा

संभाजी देशमुख -किंशासा कोंगो आफ्रिका .
किंशासाचा राजा - सालाबाद्प्रमाणे याहीवर्षी प्रचंड उत्साहात साजरा झाला हा मध्य आफ्रीकेतील एकमेव सोहळा. किंशाच्या राजाचे यावर्षीचे हे ८ वे वर्ष. यावर्षी दोन मूर्तींची स्थापना झाली होति. एक मूर्ती श्री विजय अवलास्कर यांनी पाठवली होती तर दुसरी मूर्ती श्री अक्षय साळेकर यांनी पाठवली होती. किंशासामध्ये मोजकीच मराठी कुटुंबे राहतात पण अति उत्शाही हि मंडळी बरोबर अन्य भारतीयांना घेऊन अत्यंत उल्हासात गणेश उत्सव साजरा करतात. संपूर्ण दहा दिवसांचा भव्य दिव्य सोहळा पाहण्यासाठी आणि गणपती बाप्पांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यासाठी मंडळी वाट पाहत अस् तात. ९ सप्तेम्बेर रोजि. दुपारी १ वाजता श्रींची महाराष्ट्रासारखाच अतिशय पवित्र आणि मनोरंजक असा हा सोहळा आफ्रिकेतील एकमेवच असावा. संपूर्ण दहा दिवसांचा हा उत्सव ८ वर्षे अखंड आणि अप्रतिम असा साजरा होतोय.
संपूर्ण दहा दिवसांच्या सोहळ्याचे वेळापत्रक म्हणजे रोज सकाळी ७ वाजता आरती, संध्याकाळी ७ वाजता भजन, ८ वाजता महा आरती नंतर कार्यक्रम आणि महा प्रसाद असे कार्यक्रम होते. लहान मुलांच्या साठी आणि सर्व अबल्वृद्धान्च्यासाठी वक्तृत्व स्पर्धा तसेच संगीत खुर्ची, अप्रतिम पोशाख स्पर्धा , संगीत आणि नाचण्याच्या स्पर्धा, लिंबू चमचा स्पर्धा, अंताक्षरी , हौसी, सुरेख पाक कला , पिआनो वादन आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या वर्षी सुद्धा सुट्टीचा दिवस नसताना देखील श्रींची स्थापना प्रचंड उत्सहात आणि भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतीसादेत शलि. कार्यक्रमाला भारताचे उच्चायुक्त श्री व सौ. मनोहर राम आवर्जून उपस्थित होते. जगदीश महाराज त्रीवेदींच्या स्त्रोत्र आणि पठन आणि अतिशय पवित्र वातावरणात येथील हिंदू मंदिराच्या औदितोरिउम मध्ये श्रींची स्थापना करण्यात आली होति. स्थापनेला नेहीम्प्रमाणे सुमारे शंभर ते दीडशे लोकांची उपस्थिती होति. तसेच कार्यक्रमास कोंगो-इंडिया चाम्बेर्स & कॉमर्स चे अध्यक्ष श्री रशीद पटेल देखील न चुकता हजर होते.
मंगळवारी स्त्रीयान्च्य्साठी संगीत खुर्ची चे आयोजन केले होते. बुधवारी लहान मुलांसाठी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली . गुरुवारी लहान मुलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा झाली . शुक्रवार हा अतिशय महत्वाचा दिवस होता लहान मुलांसाठी सुरेख पोशाख स्पर्धा झाली २ वर्षांच्या किशन कन्हैया पासून दहा तोंडी रावण असे एकूण पंचवीस ते तीस स्पर्धक होते. एकामागून एक अशा अनेक रुपामुळे परीक्षक भाम्बून गेले होते. सुमारे दोन तास चाललेली हि स्पर्धा नानात विजेता घोषित करून सम्पवलि. नंतर हौझीचा खेळ झाला
शनिवारी
कार्यक्रम झाला . राविवारी तीन गटासाठी चित्रकला स्पर्धा झाली लहान गटामध्ये ४ वर्षे ते ७ , ८ वर्षे ते पंधरा वर्षे आणि नंतर सोळा वर्षान्च्यावारील सर्वांनी स्पर्धेत भाग घेतला होता प्रत्येक गटामध्ये तीन पारितोषिके होती . संध्याकाळी लहान गटासाठी लिंबू आणि चमचा स्पर्धा झाली आरती ननतर सुमारे वीस स्पर्धकांनी संगीत, नाट्य आणि नाचण्याच्या स्पर्धेत भाग घेतला होता हिंदी सिनेमा तील गाणी, काही नाटके आ णि गीतांच्या संगीत्वर नाचगाणे कार्यक्रम खूपच रंगला होता सुमारे पाचशे दर्शक मंत्रमुग्ध झाले होते
रविवारच्या भरगच्च कार्यक्रमामुळे किंशासाच्या गणेश उत्सवाचे मुख्य आकर्षण असलेला "भव्य बक्षिसांचा" लकी ड्रा सोमवारी आरतीनंतर घेण्यात आला सुगरणी साठी अप्रतीम पाक कला असा कार्यक्रम झाला गणेश उत्सव मंडळाने मुद्दाम आमंत्रित केलेल्या भारतीय भ्जानालायातील मुख्य आचारी हे या कार्याक्रमचे मुख्य परीक्षक होते. सुमारे पंधरा भगिनी या कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षण होत्या सुमारे अर्धा तासांच्या परीक्षणानंतर तीन निवडक स्पर्धकांना पारितोषिके जाहीर केली
मंगळवारी दिनांक सतरा रोजी आभारप्रदर्शन आणि बक्षीस वाटपाचा दिवस संध्याकाळी आरती नंतर हा मुख्य कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी मुद्दामहून मागविलेल्या फुलानि व्यासपीठ सजविले होते. श्री अजय शर्मा आणि मनोहर सालेकर यांच्या कल्पकतेतून देखावा रंगविला होता
या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी भारतीय दूतावासातील अधिकारी श्री प्रदीप यादव आणि श्री अमीर चंद होते कोंगो हिंदू मंडळाचे अध्यक्ष कमलेश शुक्ल आणि सर्व पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते. श्री तुषार अध्वर्यू यांनी सुरेख सुत्रसंचलन केले. मुख्य अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले आणि कार्याक्रमची सुरुवात केलि. प्रारंभी श्री कमलेश शुक्ल यांनी आपले विचार मांडले आणि गणेश उत्सव मंडळाचे कौतुक केले. नंतर श्री संभाजी देशमुख यांनी गणेश उत्सव सोहळ्याचे रूप आणि लोकमान्य टिळकांचे अभिप्रेत आपण कसे सकारात आहोत याबद्दल माहिती दिलि. सर्व देणगीदार, हितचिंतक , अबल वृद्ध प्रेक्षक आणि गणेश उत्सव मंडळाचे सर्व अधिकारी यांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाला उपस्थित सर्व मंडळींचे आभार मानले आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना बक्षिसे , पारितोषिके आणि पदके बहाल केली
विसर्जनाचा सोहळा देखील डोळ्यांना पारणे फेडणारा होता सर्व भाविक डोक्यावर भगवी टोपी ,अंगात मंडळाचा टी शर्ट आणि हातवार भगव्या पट्ट्या बांधून बाप्पाला निरोप देण्यासाठी आवर्जून उपस्थित होती
उत्तरपूजा आणि आरतीनंतर लेझीमच्या तालावर कार्यक्रम झाला मंडळाचे हौशी मंडळी आणि उपस्थित प्रेक्षक सर्वांनी मिळून या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला।
नंतर बाप्पा ची विसर्जन मिरवणूक यात्रा किंशासापासून दूर सुमारे पन्नास किलोमीटर वर असलेल्या अलीना या नदीकिनारी असलेल्या ठिकाणी पोहोचली .बस्मधिन आरती भजन आणि मंगल मोरयाच्या तालावर बाप्पाची बसमधून मिरवणूक होति. यावर्षी प्रथमच बसचा यशस्वी वापर केला होता . नदीकिनारी पूजा अर्चा झाल्यानंतर पुन्हा आरती झाली आणि विसर्जनाचे मंत्र पठण करून बाप्पाला निरोप देण्यात आला . गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणेने परिसर दुमदुमला होता
सर्व उपस्थित भाविकांच्साठी भोजनाचे आयोजन केले होते भोजन आटोपून पुन्हा मंदिरामध्ये आरती केली आणि बाप्पान्चाय्कडे नतमस्तक होऊन दहादिवासाम्ध्ये काही चुका झाल्या असतील तर माफीनामा मागीतला आणि पुढच्या वर्षी लवकर येण्यचे निमंत्रण देऊन हा कार्यक्रम समाप्त झाला
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री संभाजी देशमुख व सौ सुनिता देशमुख , श्री व सौ मधु नायडू , श्री, अजय शर्मा , श्री व सौ रुपेश पारीख , श्री व सौ तुषार अध्वर्यू श्री मनोहर साळेकर श्री विपुल उम्बलकर श्री प्रवीण सावंत श्री नरेंद्र गोडबोले श्री व सौ आशिष ,श्री व सौ विजय थोरात , दीपक , भुमिक, श्री हरेश ,श्री शिरीष , श्री गणेश , श्री मंदार देसाई , श्री अमित गुळेकर , श्री मितेश खंडेलवाल श्री मुकुंद राठी श्री ज्ञानेश्वर विटोले, श्री दिव्येश मान्ग्रोलीया आणि तमाम मराठी स्वयंसेवक तसेच सर्व गणेश प्रेमी मंडळी यांनी सहकार्य केले

000
Read 1284 times Last modified on Monday, 23 September 2013 17:42
Rate this item
(0 votes)

Leave a comment

Make sure you enter all the required information, indicated by an asterisk (*). HTML code is not allowed.

morpinch1